आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराOLX वर खरेदी-विक्रीचे आमिष दाखवून १० लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात अज्ञात आरोपीने दहा ते बारा जणांना ऑनलाईन लुबाडले आहे. या व्यक्तीविरोधात चंदननगर पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुक आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली आहे.
याबाबत पाेलिसांकडे रविंद्र कुमार भागचंद पिंचा (वय-38,रा.वडगावशेरी,पुणे) यांनी अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. ऑनलाईन फसवणूकीचा हा प्रकार जूलै 2022पासून आतापर्यंत घडला आहे.
फोन करून दिले अमिष
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रविंद्र पिंचा यांच्याशी आराेपी तसेच इतर व्यक्तींनी वेगवेगळया क्रमांकावरुन संर्पक साधला. त्यांना OLX वरून साहित्य खरेदी विक्री करण्याचे भासवून लबाडीने त्यांच्या खात्यावरुन 46 हजार 300 रुपये आराेपींनी स्वत:चे बँक खात्यात वर्ग करुन घेतले.
ऑनलाईन फसवणूक उघड
त्याचप्रमाणे अशाप्रकारे OLX वरून वस्तू खरेदी विक्री करण्याचे अमिष दाखवून इतर व्यक्तींच्या बँक खात्यातून एकूण 10 लाख 32 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. एकूण दहा लाख 78 हजार 300 रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत तक्रारदार व इतर व्यक्तींनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. पाेलिसांनी याबाबतची चाैकशी करुन चंदननगर पाेलिस ठाण्यात गुन्हा वर्ग केल्यावर आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास चंदननगर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.