आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन फसवणूक:टेलिग्रामवर टास्कच्या नावाखाली भामट्यांकडून 16 लाख रुपयांचा गंडा, घरून काम करण्याचे आमिष दाखवत लुटले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन वर्कच्या नावाखाली टास्क पूर्ण करण्यास सांगून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 16 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेमध्ये निलेश मोहनलाल बांगरेचा( वय- 45 ,राहणार - वाघोली, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार चार आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेलिग्रामवर फसवणूक

रिया शुक्ला ,प्रांजल सिंघल ,मानवी गोयल, अवंतिका गुलेरिया (सर्व राहणार पंजाबी बाग, दिल्ली) असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना 13/ 4 /2023 ते 17/ 4 /2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने व टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून घडली आहे.

आरोपीने टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन वर्कच्या नावाखाली तक्रारदार निलेश बागरेचा यांना टास्क पूर्ण करण्यास सांगितला. त्याकरीता वेगवेगळे प्लॅन त्यांना सांगून विविध खात्यावर एकूण आठ लाख 56 हजार रुपये त्यांना भरण्यास भाग पाडून त्यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे एस पाटील पुढील तपास करत आहेत.

सात लाखांचा गंडा

दुसऱ्या घटनेमध्ये, खडक पोलीस ठाण्यात प्राची रवींद्र सहस्त्रबुद्धे (वय -30, रा-शुक्रवार पेठ ,पुणे) या तरुणीने पोलिसांकडे अज्ञात टेलिग्रामधारका विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना २०/४/२०२३ ते २५/४/२०२३ यादरम्यान घडली आहे.संबंधित अज्ञात मोबाईल क्रमांक धारक आणि टेलिग्राम आयडी धारक यांनी तक्रारदार प्राची सहस्त्रबुद्धे यांना मोबाईलवर मेसेज पाठवून घरी बसून ऑनलाईन पद्धतीने काम करण्याचे आमिष दाखवले.

त्यासाठी टेलिग्रामवर टास्क पूर्ण करून बेनिफिट मिळवण्याचे आमिष दाखवून त्यांना टेलिग्राम ग्रुप मध्ये ऍड करून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून सात लाख 64 हजार रुपये ऑनलाईन घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत खडक पोलीस पुढील तपास करत आहेत.