आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवासासाठी रेंटल कार बुकिंग करत असलेल्या एका प्रवाशाला ऑनलाइन भामटयांनी गंडा घालत तब्बल दाेन लाख 45 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडे विजय सदाशिव पाटील (वय-46,रा.आंबेगाव,पुणे) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली आहे. सदरचा प्रकार 15/10/2022 राेजी घडला असून याबाबत अर्ज चाैकशीवरुन पोलिसांनी उशिराने गुन्हा दाखल केलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय पाटील यांना घटनेच्या दिवशी प्रवास करावयाचा हाेता याकरिता त्यांनी ऑनलाइन रेंटल कार बुकिंग शाेधत हाेते. त्यावेळी त्यांना एका माेबाईल क्रमांकावरुन राेहित नावाच्या तरुणाने फाेन करु त्यांना रेंटल कार बुकिंग करण्यासाठी संपर्क साधला. सदर इसमाने तक्रारदार यांना महादेव ट्रव्हल्स डाॅटकाॅम या अॅपची लिंक पाठवून ते वेबसाईटवरुन डाऊनलाेड करण्यास सांगितले. त्यानंतर कार बुकिंग करण्यासाठी संबंधित अॅपवरुन 100रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. ते पैसे पाठविताना त्यांच्या अॅक्सीस बँक व एचडीएफसी बँक खात्याच्या क्रेडीट कार्डचे डिटेल भरण्यास सांगण्यात आले.
सदर क्रेडीट कार्डचे डिटेल्स भरल्या भरल्या त्यांचे पैसे गेले नाहीत. परंतु थाेडयावेळाने त्यांच्य क्रेडीट कार्डवरुन परस्पर ट्रान्झेक्शन झाल्याचे मेसेज येवू लागले. त्यामुळे त्यांनी राेहित नावाचे संबंधित इसमाशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे राेहित या इसमाने रेंटल कार बुकिंग करण्याच्या बहाण्याने क्रेडीट कार्ड द्वारे एकूण दाेन लाख 45 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस पुराणिक पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.