आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune, A Young Woman Was Stabbed By A Young Man For Unrequited Love, A Married Man Assaulted A Young Woman And Her Friend; Filed A Case

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार:विवाहित तरुणाकडून तरुणीसह तिच्या मैत्रिणीला मारहाण; गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन 17 वर्षांच्या मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने, रागातून तिच्यावर काेयत्याने वार करत तिच्यासह तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आराेपी अशिष मारुती धणके (वय-24,रा.फुरसुंगी,पुणे) याचेवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अशी माहीती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.

सदरचा प्रकार ऑक्टाेबर 2022 ते 13/12/2022 यादरम्यान घडलेली आहे. आराेपी हा पिडित मुलीच्या ताेंडओळखीचा आहे. त्याने तिचा विनयभंग करण्याचे उद्देशाने पाठलाग करुन त्याच्या प्रेमास नकार दिला. याकारणावरुन आराेपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडितेने ही बाब आराेपीचे पत्नीस सांगितल्याचे रागातून चिडून आराेपीने पिडित मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचला धक्काबुक्की करुन तिचे मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करत, ‘आज तुला खल्लास करताे, तुला आज जिवंत साेडणार नाही’ असे म्हणत काेयत्याने तिच्यावर वार केला. परंतु मुलीने ताे वार चुकवला, यावेळी पिडीतेच्या सोबत असलेल्या मैत्रिणीला देखील आराेपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या छातीवर धक्का मारुन नखाने ओरखडल्या प्रकरणी संशयात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस.डमरे करत आहे.

डाॅक्टरच्या चालकाकडून तरुणीचा विनयभंग

पुण्यातील काेथरुड परिसरातील एका नामांकित लॅबमध्ये काम करत असलेली 25 वर्षीय तरुणी 9 डिसेंबर राेजी रात्री कामावरुन सुटल्यानंतर घरी जात हाेती. त्यावेळी लॅबजवळ डाॅक्टरांचा कारचालक मेघबहादूर भवानीराव रावल (वय-39,रा.काेथरुड,पुणे) याने तरुणीला थांबवून डाॅक्टरांच्या हाेंडा सीटी कारमधून तिला घरी साेडताे सांगत तिला कारमध्ये पुढील सिटवर बसवले. त्यानंतर कार कर्वेनगरकडे चालली असताना,एका चाैकात गाडी बाजुला घेवून तरुणीच्या अंगास वेळाेवेळी हात लावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केल्याने आराेपीला पोलिसांनी अटक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...