आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एका सुशिक्षित आणि चांगल्या नोकरीत असलेल्या तरुणाने अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. विरेण जाधव (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चांगल्या पगाराची नोकरी आणि सर्व सुखसुविधा असताना माझे मन त्यात लागत नाही' अशाप्रकारचा मजकूर त्याने डायरीत लिहिला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली येथे असलेल्या रिव्हर रेसिडेन्सी येथे विरेण जाधव राहण्यास होता. या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन त्याने उडी घेतली आहे. त्याची एक डायरी पोलिसांनी जप्त केली आहे. या डायरीत नोकरी चांगली आहे. मात्र माझे मन त्यात लागत नाही असा उल्लेख त्याने केला आहे. चिखली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
पोलिस तपास सुरु
विरेण हा आई वडिलांसह या रेसिडेन्सीत राहत होता. तो नामांकीत कंपनीत नोकरी करत होता, चांगला पगार असताना आयुष्यात आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे अशी माहिती प्राथमिक तपासानंतर चिखली पोलिसांनी दिली आहे. मात्र यापाठिमागे आणखी काही कारणे असू शकतात का, याचा देखील पोलिस तपास करत आहेत.
आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर
नोकरी चांगली असली तरी त्यात आनंद मिळत नाही असे काही मुद्दे विरेनने त्याच्या डायरीत लिहिले आहेत. मात्र सर्वकाही सुरळीत असताना असे कोणते दुःख होते जे त्याने लपववे याबाबत त्याचे पालकही अनभिज्ञ आहेत. त्याच्या जाण्याने त्याच्या आई वडिलांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.