आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक निकाल:भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा गुलाल; तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप 36 हजार 770 मतांनी विजयी

पुणे21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

पुण्यातील कसाबा पेठ मतदार संघात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी 28 वर्षांच्या विजयाची परंपरा मोडित काढते महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचा निधनाने ही निवडणूक झाली.

चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला. या ठिकाणी राहुल कलाटे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. मात्र, जगताप यांनी जवळपास 36 हजार 770 मतांनी विजय मिळवला.

LIVE

- चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नान काटे यांना 36 हजार 770 मतांनी पराभूत केले. अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते पडली. नाना काटे यांना 99 हजार 343 मते पडली. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 40 हजार 82 मते पडली.

- चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप या विजयाच्या जवळ आहेत. त्यांची आघाडी आता तब्बल 35 हजारांच्या घरात गेली आहे. सध्या नाना काटे 93381 मतांवर आहेत. तर अश्विनी जगताप या 128476 वर आहेत.

- चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची विजयाकडे आगेकूच सुरू आहे. त्या सध्या 1 लाख 16 हजार 838 वर आहेत, तर नाना काटे हे 87 हजार 80 मतावर आहेत. जगताप यांच्याकडे जवळपास 29 हजारांची आघाडी आहे.

- पोटनिवडणुकीत भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला. त्यामुळे भाजपचला जनतेने धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

- चिंचवड पोटनिवडणुकीत बावीसाव्या फेरीअखेरी भाजपच्या अश्विनी जगताप यांनी 77404, महाविकासा आघाडीचे नाना काटे यांना 67644, तर अपक्ष राहुल कलाटे यांने 28145 मते.

- कसब्यात रवींद्र धंगेकरांनी मिळवलेला विजय हा महाविकास आघाडीची एकजूट आणि नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. जनमताचा हा कौल भाजपविरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर विजय आहे. हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाने लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला आणि त्यांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली.

- कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. निवडणूक आयोग प्रमाणपत्र दिल्यानंतर ही जागा देऊ, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

- विधानसभेत देवेंद्र फडणीस यांनी नाना पटोलेंना उत्तर दिले. ते म्हणाले, चिंचवडचा ही निकाल येणार आहे, तो ही स्वीकारावा लागेल. कसब्याचे काही आत्मचिंतन आम्ही करू, तसे तुम्हालाही तुम्हालाही आत्मचिंतन करावे लागेल, असा टोला हाणला.

- कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. भाजपच्या रासने यांनी निकालापूर्वीच माध्यमांशी बोलताना पराभव केला होता मान्य.

- चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांना चौदाव्या फेरीअखेर 49079 मते. नाना काटे यांना 40766, तर राहुल कलाटे यांना 15017 मते.

कसबा मतदासंघ

उमेदवाराचे नावमते
रवींद्र धंगेकर (मविआ)56,497 (आघाडीवर)
हेमंत रासने (भाजप)50,490

​​​​​चिंचवड मतदारसंघ

उमेदवाराचे नावमते
अश्विनी जगताप (भाजप)39,048 (आघाडीवर)
नाना काटे (मविआ)30476
राहुल कलाटे (अपक्ष)11458
 • कसबा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ 123 मते मिळाली आहेत.
 • कसब्यात दहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांनी एकूण 38263 मते मिळवून आघाडीवर आहे. भाजपच्या हेमंत रासने यांना 34036 मते.
 • चिंचवडमध्ये नवव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांनी 32288 मतांनी आघाडी मिळवली आहे. तर, मविआचे नाना काटे यांना 25922, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 10705 मते मिळाली आहेत.
 • कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची करुन ठेवली. त्यामुळे यातील एक जरी जागा महाविकास आघाडीला मिळाली तर हा भाजपसाठी मोठा धक्का असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर जयंत पाटलांनी प्रचारात भाजपविरोधी वातावरण दिसल्याने महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला. वाचा सविस्तर
 • लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रीया अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज मतमोजणीच्या दिवशी भावनिक प्रतिक्रीया दिली आहे. वाचा सविस्तर
 • आठव्या फेरीत रवींद्र धंगेकर 30527 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 27187 मते मिळाली आहेत. तर, चिचंवडमध्ये अश्विनी जगताप यांनी 4 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
 • सातव्या फेरीत रविंद्र धंगेकर एकूण 25904 मतांसह आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना 24633 मते मिळाली आहेत.
 • कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीत मतमोजमीच्या सहा फेऱ्या पार पडल्या आहेत. कसब्यात मविआचे रविंद्र धंगेकर हे जवळपास 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनीही 3 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.
 • कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत.
 • तिसऱ्या फेरीत कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. तर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
 • चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अश्विनी जगताप सध्या केवळ 500 मतांनी आघाडीवर आहेत.
 • कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
 • चिंचवड पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. मविआचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
 • कसबा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.
 • कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम गोदामात होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास देखील पोलिसांनी मनाई केली आहे. वाचा सविस्तर

गेल्या विधानसभा निवडणुकीत असे होते चित्र

सत्तांतरानंतर विधानसभेची पहिली निवडणूक

कसबा व चिंचवड या दोन्ही मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला असून त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा निकाल महत्त्वाचा मानला जातोय.

दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणुक आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लगले आहे.

मतमोजणीच्या 20 फेऱ्या

कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे होत आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

संबंधित वृत्त

1) कोण आहेत अश्विनी लक्ष्मण जगताप:पोलिस अधिकाऱ्याची मुलगी ते आमदाराची पत्नी.... आता मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार का?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना भाजपच्या वतीने चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदार संघात अवघ्या काही दिवसातच पोटनिवडणूक लागली. त्यामुळे प्रचाराला जास्त वेळ मिळाला नाही. मात्र, आमदार जगताप यांच्या निधनानंतर मिळालेल्या उमेदवारीमुळे त्यांच्या पाठीशी लोकांची सहानभूती होती. वाचा सविस्तर

2) कोण आहेत रवींद्र धंगेकर:शिवसेना-मनसे-काँग्रेस असा राजकीय प्रवास; राज ठाकरेंचे सैनिक ते बापटांचे कट्टर विरोधक, वाचा राजकीय वाटचाल

शिवसेनेमध्ये 10 वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षांचा प्रवासही तेवढाच प्रदीर्घ आहे. सुरुवातीला 10 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेले रवींद्र धंगेकर नंतर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बनले होते. मनसे मध्ये अनेक पदावर त्यांनी कामे पाहिले. त्याचबरोबर पक्षाची शहरातील स्थिती लक्षात घेता धंगेकर यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या संपर्कात येऊन भाजपमध्ये प्रवेश निश्चित केला होता. मात्र, कसबा मतदार संघातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्याने त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही. वाचा सविस्तर

3) देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार:पोटनिवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. त्यावर निवडणूक आयोगानी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. वाचा सविस्तर

4) भाजपचे रासने, आघाडीचे धंगेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे, भाजपचे दोन माजी नगरसेवक, 15 कार्यकर्त्यांवर गुन्हे

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रूपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली असून रासनेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणात दाखल तक्रारीवरून भाजपच्या माजी नगरसेवकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...