आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह मिळाला:महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले शव

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मृत ॲड. शिवशंकर शिंदे - Divya Marathi
मृत ॲड. शिवशंकर शिंदे

पिंपरी चिंचवड शहरात राहणारे एक वकील 31 डिसेंबर राेजी दुपारी काळेवाडी परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली हाेती. सदर वकीलाचा पोलिस शाेध घेत असताना, महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर मदनुर येथे त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह साेमवारी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिवशंकर शिंदे असे खून झालेल्या वकीलाचे नाव आहे.

काय आहे घटना ?

अ‍ॅड. शिवशंकर शिंदे यांचे पिंपरी चिंचवड शहरात काळेवाडी येथे ऑफीस आहे. तसेच ऑफीस मध्ये 31 डिसेंबर राेजी ते काम करत बसले हाेते. त्यानंतर दुपारच्या सुमारास अचानक ते बेपत्ता झाले. ते मिळून येत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसेच सर्वत्र शाेध घेण्यात आला परंतु त्यांना ते मिळून आले नाही. अखेर त्यांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली हाेती.

मृतदेह आढळल्याने खळबळ

शिंदे यांचा पोलिसांनी शाेध सुरू केल्यानंतर, पोलिसांना त्यांच्या कार्यालयात घटनेच्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीशी व्यवसायिक वादातून झटापटी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याअनुषंगाने पोलिस अधिक तपास करत असताना, अचानक महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर अ‍ॅड. शिंदे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करत आहे. गुन्हे शाखेची पथके ही सदर भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आराेपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

काेंढव्यात मिळाला महिलेचा अर्धविवस्त्र मृतदेह

पुण्यातील काेंढवा परिसरात साेमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान एनआयबीएम रस्त्यावर मेफेअर साेसायटीजवळ एका माेकळया मैदानात पोलिसांना 30 ते 35 वर्ष वयाेगटातील महिलेचा अर्ध विवस्त्र अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. काेंढवा पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. मृत महिला नेमकी काेण हाेती याबाबत तिची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...