आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद:पुण्यातील भर रस्त्यावर एका युवकाने धारधार शस्त्राने केली हत्या, मारहाण केल्याचा होता राग, मोबाईल लोकेशनवरुन आरोपीला अटक

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीला मारहाण हत्येचे कारण

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे रविवारी एका युवकाने आपल्या शेजाऱ्याची धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी आपल्या आपल्या शेजाऱ्यावर धारदार शस्त्राने वारंवार हल्ला केला करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला चार तासात अटक केली आहे.

अशी घडली घटना?
मृतकाचे नाव कानिफनाथ क्षीरसागर आहे. घटनेच्या दिवशी तो आपला मुलगा मित्रांसोबत दुपारी दीड वाजता आपल्या घरासमोर उभा होता. दरम्यान तिथे आरोपी आकाश जाधव आला आणि त्याने आपल्या थैलीतून धारदार शस्त्र काढत त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर क्षीरसागर तेथून पळाला आणि थोड्या अंतरावर जाऊन खाली कोसळला त्याच्यानंतर आरोपीने त्याच्यावर वारंवार हल्ला केला आणि डोक्यात दगड घातला. क्षीरसागर याला दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला.

आरोपीला मारहाण हत्येचे कारण
तपासानुसार, मृतक कानिफनाथ आणि आरोपी आकाश दोन्ही शेजारी राहिलेले आहेत. काही दिवसांपूर्वी आकाशला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण कानिफनाथच्या सांगण्यावरुन करण्यात आली असे आकाशला माहित झाले होते. तेंव्हापासून तो रागात होता.

मोबाईल लोकेशन वरून केली अटक
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपी आकाश जाधवची ओळख केली. त्यानंतर मोबाईल लोकेशनवरुन आरोपीला चार तासांच्या आत अटक केली. फोटो जोडून आरोपीची ओळख केले आणि पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि व्हिडिओ फुटेज चार तासाच्या अटक केली.

बातम्या आणखी आहेत...