आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 'ती' असुरक्षितच:चौघांकडून दारुसह मिरची पावडरचा वापर करून तरुणीवर अत्याचार

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील निगडी परिसरातील गंगानगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिला पकडत तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तीच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारू ओतून तीच्या हातावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (22 सप्टेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निगडी येथील गंगानगर येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे अशी माहिती शुक्रवारी दिली आहे.

या धक्कादायक घटनेबाबत पिडीत तरुणीच्या 32 वर्षीय बहिनीने गुरुवारी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन मारुती घाडगे (वय 31, रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव,पुणे ) याच्यासह तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतन घाडगे याला अटक केली आहे.

घटना नेमकी काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण म्हणजेच पिडीत २७ वर्षीय तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदीरातून देर्शन घेऊन परत येत होती. रस्त्यावर असणाऱ्या कणीस विक्रेत्याकडून पिडीत तरुणी कणीस घेत होती. त्याच वेळी आरोपी चेतन घाडगे आणि तीन साथीदार तेथे आले. तरुणीला पाहून काढ रे काढ कोयता, हीचेवर वार कर, असा दम त्यांनी भरला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तेथून पळ काढला. तरुणी रस्त्याने पळत असताना आरोपींनी तीचा पाटलाग केला. त्यामुळे तरुणी गुरुदेवनगर येथील एका सार्वजनीक शौचालयात जाऊन लपली. आरोपीही तीच्या मागे पळत या शौचालयात गेले. आरोपींनी तरुणीला पकडत तीच्या अंगावर आणि गुप्तांगावर दारू ओतली. तीला मिरची पावडर खाऊ घातली. तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर तीच्या हातावर ब्लेडने वार करत तीला जखमी केले. तीच सर्व कपडे फाडून आरोपी तेथून फरार झाले. पोलिस उपनिरीक्षक उत्तम ओमासे पुढील तपास करत आहेत.

प्रेमसंबंधातून तरुणीवर वार

प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रियसीवर धारदार शस्त्राने वार करत तीला जखमी केल्याची घटना 21 सप्टेंबर रोजी म्हाळूंगे येथे घडली. या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.पिडीत मुलीच्या वडीलांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले आहे. त्यानुसार, गजानन अंगद चौधरी (वय 31, रा. म्हाळूंगे,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. फिर्यादी यांची 27 वर्षीय मुलगी आणि आरोपी यांचे प्रेमसंबध आहेत. यातून त्यांची वारंवार भांडणे होत होती. बुधवारी पिडीत तरुणी घरी एकटीच असताना आरोपी याने तीच्या घरी जाऊन धारदार शस्त्रान तीच्या तोंडावर, नाकावर, पाठीवर वार करत गंभीर जखमी केले.

बातम्या आणखी आहेत...