आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Big Police Action In Pune, Pistol Smuggler Arrested With Five Pistols And 14 Cartridges In The City, Action Near Forest Park Road

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई:8 पिस्तुल अन् 14 काडतुसांसह तस्करांना अटक, फॉरेस्ट पार्क रस्त्याजवळ कारवाई

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना, पोलिस नाईक सचिन जाधव आणि प्रदीप मोटे यांना मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेस्ट पार्क रस्त्याच्याजवळ एक इसम संशयितरित्या उभा असून त्याच्याजवळ पिस्टल आहे. त्यानुसार पोलिस पथकाने सदर ठिकाणी 31 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता छापा टाकून पिस्तुल तस्करी करणाऱ्या संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 2 लाख 26 हजार रुपये किंमतीचे पाच पिस्तुल आणि 14 काडतुसे मिळून आली आहे अशी माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी सोमवारी दिली आहे.

राहुल गोपाळ गवळी (वय-35,रा.बारीवाडा, ता.चोपडा, जळगाव) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25, 29 व महाराष्ट्र पोलिस अॅक्ट कलम 37 (1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजकीय परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पोलिस पथक पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी फॉरेस्ट पार्क रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेतील लिंबाच्या झाडाखाली एक इसम कोणाची तरी वाट पाहत असून त्याच्याकडे पिस्टल व राऊंड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार माहितीची खातरजमा करुन पोलिसांचे एका पथकाने सापळा रचून आरोपी राहूल गवळी यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता पाच पिस्टल मिळून आले आहे. आरोपी मध्यप्रदेशातून पिस्टल आणून त्याची राज्यातील विविध शहरात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलिस सहआयुक्त संदीप कर्णीक, पुर्व प्रादेशिक विभाग अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ चारचे पोलिस उपआयुक्त रोहिदास पवार, एसीपी किशोर जाधव , वपोनि भरत जाधव, पोनि (गु) मंगेश जगताप, पीएसआय रविंद्र ढावरे, अविनाश शेवाळे, पोह सचिन कदम, पोना सचिन जाधव, प्रदीप मोटे , रुपेश मिसाळ, अंकुश जोगदंडे, संजय आसवले यांचे पथकाने केली आहे.

दोन आरोपींकडून तीन पिस्टल जप्त

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने मुंढवा व चंदननगर पोलिस ठाण्याचे हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार उदय काळभोर यांना मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील हॉटेल शिवानंद येथे एका इर्टिगा कारमध्ये दोन इसमांकडे पिस्टल असून ते पिस्टल एका इसमास विक्री करण्याकरिता वाट पाहत बसले आहे. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 6 लाख 24 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी बनावटीचे पिस्टल, नऊ काडतुसे व चार सुट्टे मॅगझीन व इर्टिगा कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. अजय ऊर्फ महाराज कमलाकार भोरे (वय-28,रा. मुंढवा, पुणे) व ओंकार प्रदीप कांबळे (22,रा.काकरंबा, ता.तुळजापुर, उस्मानाबाद) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्या विरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल पंधरकर यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...