आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी:पुण्यात ‘आधी नोकरी मग फी’ शैक्षणिक कोर्स

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही संकल्पना देशभरात महाविद्यालये, खासगी विद्यापीठांच्या सहकार्याने सनस्टोन एज्युव्हर्सिटी राबवत आहे

विशिष्ट शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून उद्योगपूरक काम करून शिकणारे विद्यार्थी तयार करणे आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे यावर भर देत ‘आधी नोकरी मग फी’ ही संकल्पना देशभरात महाविद्यालये, खासगी विद्यापीठांच्या सहकार्याने सनस्टोन एज्युव्हर्सिटी राबवत आहे. अदित्य ग्रुप ऑफ कॉलेजच्या सोबतीने पुण्यात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘आधी नोकरी मग फी’ आणि ‘पैसे परत हमी’ एमबीए या दोन अभिनव कोर्सेसची सुरुवात केली आहे.

उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन सनस्टोन एज्युव्हर्सिटीने एमबीएच्या कोर्समध्ये काही मूलभूत बदल केले आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापन प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार तयार करण्यात येईल. त्यामुळे नोकरीच्या अधिक संधी त्यांच्याकडे येतील.

पुण्यातील या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनाच्या वेळी आशिष मुंजाळ म्हणाले, विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना दर्जेदार नोकरीसाठी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. एमबीएच्या कोर्समध्ये अामूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सहज संधी मिळतील आणि ते स्वीकारले जातील यावर आमचा भर आहे.

बातम्या आणखी आहेत...