आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्तास दिलासा:पुण्यातील आंबिल ओढा येथील स्थानिकांना न्यायालयाचा दिलासा, अतिक्रमणविरोधी कारवाईला लावला ब्रेक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाच्या निर्णयानंतर नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई केली जात आहे. येथील स्थानिकांच्या घरावर आज सकाळी महापालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या कारवाईला स्थानिकांकडून प्रचंड विरोध केला. यानंतर स्थानिकांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे पालिकेच्या तोडकामाला न्यायालयाने स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

आज सकाळी महापालिकेकडून आंबिलओढा परीसरातील घरांवर बुलडोजर चालवला. या कारवाईवरून स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिस आमनेसामने आले. स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. मात्र, स्थानिकांचा विरोध बाजूला सारत महापालिकेकडून पाडापाडीची कारवाई सुरूच होती. दरम्यान स्तानिकांनी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नागरिकांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.

पोलिस आणि स्थानिकांमधील वाद आज सकाळी चिघळल्याचे पाहायला मिळाले. घरे पाडण्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी कडवा विरोध केला. त्यातील 5 ते 6 जणांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावे बिल्डरांना फायदा पोहोचवण्याचा घाट सुरू आहे असा आरोप स्थानिकांनी केला. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 700 ते 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...