आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मॉरिशसच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमात मराठी लेखिका डॉ.स्नेहल तावरे यांची कविता

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉरिशस मंत्रिमंडळाच्या कडक छाननीतून तावरेंच्या कवितेला मान

मराठी भाषेला बहुप्रतीक्षित असा ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याआधीच मराठी भाषेने देशाच्या सीमा ओलांडून, अन्य देशांच्या थेट पाठ्यपुस्तकात प्रवेश मिळवला आहे. मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डाॅ. स्नेहल तावरे यांच्या कवितांनी माॅरिशसच्या ग्रेड सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे. डाॅ. तावरे यांना तब्बल ३३ वर्षांचा दीर्घ असा अध्यापनाचा अनुभव आहे. पुण्याच्या माॅडर्न काॅलेजच्या मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. भाषाशास्त्र आणि मराठी साहित्याचा इतिहास हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.

मराठी भाषेविषयी परदेशी,अनिवासी भारतीय विद्यार्थी, अभ्यासकांना कुतूहल आहे, त्यामुळे जगातील अनेक देशांत मराठी भाषेचा अभ्यास केला जातो. मी माॅरिशस मुक्त विद्यापीठाची मार्गदर्शक होते. तेथील शिक्षण आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट (रिपब्लिक ऑफ माॅरीशस) यांच्याकडून मला ‘देशाविषयी कविता द्याल का’ अशी विचारणा झाली. शालेय स्तरावरील तेथील विद्यार्थ्यांना समजेल, उमजेल अशा पद्धतीने कविता लिहिण्याचा मी प्रयत्न केला. माॅरिशसच्या शिक्षण क्षेत्रात पाठ्यपुस्तकातील मजकुराची कसोशीने छाननी केली जाते. प्रत्येक पाठ शिक्षण मंत्रालय आणि तेथील मंत्रिमंडळात मंजूर व्हावा लागतो. माझी कविता या कडक छाननीतून यशस्वी झाली आणि सुंदर चित्रांच्या सोबत पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाली, याचा आनंद मोठा आहे, ‘ असे डाॅ. तावरे म्हणाल्या.

या देशांत आयोजली मराठी भाषेची चर्चासत्रे
डाॅ. स्नेहल तावरे यांचा मराठी भाषा, अध्यापनाचा, लेखनाचा आणि प्रकाशनाचा मोठा अनुभव लक्षात घेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्वरुपाची तब्बल बावीस चर्चासत्रे विविध देशांत आयोजित केली आहेत. त्यात माॅरिशस, दुबई सिंगापूर, थायलंड, लंडन, स्वित्झर्लंड, मलेशिया, रशिया, इंडोनेशिया, जपान, श्रीलंका यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...