आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, 2700 किलो तांदूळ जप्त

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई करत 2700 किलो तांदूळ जप्त केला आहे. वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून एकत्र करून तो वाहतूक केला जात असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आल्याची माहिती खडक पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी जावेद लालू शेख (वय 35), अब्बास अब्दुल सरकावस (34)आणि इम्रान अब्दुल शेख (30, सर्व रा. काशेवाडी,भवानी पेठ, पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी या आरोपींवर पोलिस शिपाई महेश प्रकाश जाधव यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन आणि सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी सोसायटी समोर कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर आरोपी जावेद शेख, इमरान शेख आणि अब्बास सरकावस हे वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेत. ते धान्य एकत्र करून तो मालवाहतूक टेम्पो यामध्ये भरून केडगाव, ता. दौंड, पुणे येथे बाजारात बेकायदेशीर रित्याविक्री करीता घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीचा मालवाहतूक एक टेम्पो ( एमएच 12- पीक्यू 0582) आणि 40 हजार 500 रुपये किमतीचा तांदळाने भरलेल्या 54 पांढरे रंगाच्या नायलॉनच्या पिशव्या प्रत्येकी 50 किलो वजन असलेला 2700 किलो तांदूळ ( प्रतिकीलो 15 रुपये प्रमाणे ) जप्त करण्यात आला आहे अशी माहिती खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहा्यक पोलिस निरीक्षक एच. एम. काळे करत आहे.