आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी पिस्टल तस्करांविरोधात पुणे पोलिसांची मोहीम:7 सराईतांना अटक, 17 पिस्टलसह 13 जिवंत काडतूसे जप्त

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहा आणि युनिट एकच्या पथकाने दोन कारवायांमध्ये गावठी पिस्टल विक्री करणाऱ्या, सात सराईत आरोपी जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून 23 लाख 81 हजार रुपये किमतीचे 17 पिस्टल आणि 13 जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार,मोबाईल असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पुणे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

याप्रकरणी हनुमंत अशोक गोल्हार (वय- 24, रा.जवळवाडी, तालुका- पाथर्डी, जिल्हा ), प्रदीप विष्णू गायकवाड (वय -25 ,रा. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, मू. रा. बीड), शुभम विश्वनाथ गर्जे( वय - 25 ,रा. वडूले ,तालुका- नेवासा, अहमदनगर), अमरापुरता शेवगाव अहमदनगर), ऋषिकेश सुधाकर वाघ( वय- 25, रा. सोनई ,अहमदनगर ), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय- 25, रा. घडले परमानंद ,तालुका - नेवासा, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक पेट्रोलिंग करत असताना, 25 फेब्रुवारी रोजी पोलीस पथकास पिस्टल विक्री करणारे दोन डीलर वाघोली परिसरातील नानाश्री लॉज याठिकाणी आल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने सापळा रचून, आरोपी हनुमंत गोल्हार, प्रदीप गायकवाड यांना महिंद्रा कारसह अटक केली. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता, गाडीत एक गावठी बनवटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असे मिळून आली. त्यांनी विक्रीकरीता सदर गोष्टी आणल्याचे सांगितल्याने त्यांच्यावर, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता, हनुमंत गोल्हार हा नवी मुंबई येथील दोन कोटी 80 लाख रुपयांच्या दरोडा घातल्या प्रकरणी पाहिजे आरोपी असल्याचे तपासात समोर आले.

त्यामुळे पोलिसांनी अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून पिस्टल विकत घेणारे आरोपी अरविंद पोटफोडे, शुभम गर्जे , ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापा कारवाई करून १३ गावठी बनवटीचे पिस्टल, चार जिवंत काडतुसे आणि एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 21 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...