आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरासह ग्रामीण हद्दीत घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या एका सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सोन्या - चांदीचे दागिने, तीन दुचाकी, कटर असा 4 लाख 75 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, आठ गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांच्या चौकशीत संबंधित आरोपीने यू-ट्यूबवर घरफोडी आणि कटवणीच्या साह्याने घरफोडी कशाप्रकारे करावी याचे प्रशिक्षण घेऊन चोऱ्या केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली आहे.
रेवण ऊर्फ रोहन ऊर्फ बंटी बिरू सोनटक्के (वय २३ रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, पुणे ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. युनीट तीनचे पथक सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा समांतर तपास करताना घरफोडी करणारा इसम कोथरूड परिसरात सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रेवणला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सिंहगड, शिक्रापूर, शिरूर, कोंढवा हद्दीत वाहनचोरीसह घरफोडीचे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याचे पाचवी पर्यंत शिक्षण झाले असून त्याचे कुटुंबीय शिरूर येथे रहवयास आहे मात्र त्यांच्यापासून फारकत घेऊन तो अनेक वर्षापासून वेगळा राहत आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे, प्रकाश कट्टे, दीपक क्षिरसागर, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.