आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पोलिस, एफडीएची मोठी कारवाई:546 किलो भेसळयुक्त पनीरसह 4 लाख 66 हजार रुपयांचा माल जप्त

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 546 किलो भेसळयुक्त पनीरसह 4 लाख 66 हजार रुपयांचा माल जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून. ५४६ किलो भेसळयुक्त पनीरसह चार लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डेअरीचे मालक साजीद मुस्तफा शेख (वय ३२ रा. पडवळनगर थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८), राकेश श्रीबुद्धराम सिंग (वय २६), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७), अभिषेककुमार योगेशबाबु यादव (वय २२) आणि सर्फराज शराफतउल्ला शेख (वय ३५ सर्व रा. चिंचवड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती गुरवारी दिली आहे.

भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस तळेगाव दाभाडे, चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. चिंचवड येथील महाराष्ट्र मिल्क डेअरीत भेसळयुक्त पनीर तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह छापा घातला.

भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४० लिटर अँटीक ॲसीड, ६० लीटर आरबीडी पामोलीन तेल, २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकूण ४ लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त केला.

त्यांच्याकडून भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४, हजार रुपये रुपये किंमतीचे १४० लिटर अ‌ॅसेटीक अ‌ॅसीड ६,३२० रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल, ४,५०० रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३,३२,५००रुपये किंमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२००-रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण चार लाख ६६ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त केला आहे.

सदरची कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.