आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिस बिर्याणी प्रकरण:'ही संपूर्णतः मॉर्फ क्लिप, ऑडियो क्लिपची चौकशी झालीच पाहिजे, हे माझ्या विरुद्धचे षडयंत्र', पुण्याच्या पोलिस उपायुक्ताची मागणी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बदल्यांच्या काळातच ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली?

पुणे पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील एक संभाषणातील ऑडियो क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे पुणे पोलिस दला खळबळ माजली आहे. यामध्ये महिला पोलिस उपायुक्त आपल्या कर्मचाऱ्याला बिर्याणीची ऑर्डर देत असल्याचे दिसत आहे. तसेच आपल्या हद्दीत हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज? असा सवाल करत आहे. यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आता महिला पोलिस अधिकाऱ्यांनी ही क्लिप मॉर्फ असल्याचे म्हटले आहे.

साहेबांना मटण मला चिकन आवडते:फुकट बिर्याणी मागवणाऱ्या पुण्यातील पोलिस उपायुक्ताची फोन रेकॉर्डिंग लीक! गृहमंत्री म्हणाले- गंभीर विषय, चौकशीचे आदेश काढले

हे माझ्या विरुद्धचे षडयंत्र
पुण्यातील या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव उपायुक्त प्रियंका नारनवरे असल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी स्वतः एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी संवाद साधत आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्या की, 'ऑडिओ क्लिपची चौकशी व्हायलाच पाहिजे. या क्लिपची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच सत्य काय आहे ते समोर येईल. गृहमंत्र्यांनी याविषयी जे आदेश दिले आहेत, त्यावरून सर्व काही स्पष्ट होईल. हे माझ्या विरुद्धचे षडयंत्र आहे. असे पोलिस उपायुक्त म्हणाल्या आहेत.

बदल्यांच्या काळातच ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली?
पुणे पोलिस उपायुक्त नारनवरे म्हणाल्या की, माझ्या झोनमधील काही कर्मचारी हे बऱ्याच वर्षांपासून ठाण मांडून बसलेले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक हितसंबंध जोडले गेले होते. येथे हप्तेगिरी सुरू होती. माझ्या पूर्वी येथे जे अधिकारी काम करत होते, ते देखील यामध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बदल्यांच्या काळातच ही मॉर्फ क्लिप बाहेर का आणली गेली? असा सवाल त्यांनी केला आहे. ही संपूर्ण क्लिप माझी नाहीये. माझ्या विविध संभाषणांमधील वाक्य यामध्ये जोडण्यात आलेले आहेत. यासोबतच यातील काही भाग जो ऐकालया मिळतोय तो मी बोललेलेच नाही. ही संपूर्णत: मॉर्फ क्लिप आहे, याबाबच चौकशी व्हायलाच पाहिजे आणि मी या विरोधात सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

त्या ऑडियो क्लिपमध्ये काय म्हणत आहेत महिला पोलिस?

महिला पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील संभाषणाची जवळपास पाच मिनिटांची ही ऑडियो क्लिप आहे. यामध्ये डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत असल्याचे दिसत आहे. त्यांना हे सगळे एका चांगल्या हॉटेलमध्ये आणायचे आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नसले पाहिजे असे त्या म्हणतात. त्याचबरोबर त्याची चव चांगली असायला हवी अशी फर्माइशही त्यांनी केली आहे. या डीसीपी मॅडमनी फक्त ऑर्डर दिली नाही तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केला आहे. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणले असल्याचे सांगत आहे. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावताना या क्लिपमध्ये दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...