आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलिस हवालदाराने मागितली लाच; 20 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिगवन पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराने जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये लाच स्वीकारत असताना,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून आरोपीस रंगेहाथ अटक केली आहे.

याप्रकरणी आरोपी पोलिस कर्मचाऱ्या विरोधात भिगवण पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास लक्ष्मण जाधव असे आरोपी पोलिस हवालदाराचे नाव आहे. यातील तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस हवालदार रामदास जाधव याने 25 हजार रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचे बरोबर चर्चा करुन पोलिस हवालदार रामदास जाधव यानी प्रथम 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. नंतर तडजोडीअंती 20 हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून त्याच्यावर लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.पुणे एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले याबाबत पुढील तपास करत आहेत.

तलाठी एसीबीच्या जाळ्यात

मृत आईचे सात बारा वरील नाव कमी करण्यासाठी तलाठ्याने दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. तलाठीने मदतनीस खाजगी व्यक्ती मार्फत पैसे स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगीहात पकडले आहे. सदर दोघांवर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख यांनी तक्रारदार यांची मृत आई यांचे सातबारा वरील नाव कमी करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. यावर तक्रारदार यांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर लेखी तक्रार दिल्यानंतर, याची पडताळणी करून एसीबी पथकाने सापळा रचला.

यात तलाठी नीलम मानसिंग देशमुख यांच्यासाठी खाजगी व्यक्ती नारायण शेंडकर यांनी ही दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, सह्यक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.