आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिस आयुक्तांचा आदेश:वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनाही तीन शिफ्टमध्ये ड्युटी; रात्री 2 वाजेपर्यंत असणार हजर

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार आता वर्दळीच्या काही ठिकाणी ट्राफिक नियमनासाठी वाहतूक कर्मचाऱ्याना तीन शिफ्टमध्ये ड्युटीला हजर व्हावे लागणार आहे. संबंधित वाहतूक कर्मचाऱ्याना रात्रपाळी (रात्री दोन वाजेपर्यंत) करावी लागणार आहे. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने नियोजन केले असून वाहतूक नियमनाची अमलबजावणीला सुरूवात झाली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

कोंडीत पडली भर

वाढती वाहनसंख्या, अरूंद रस्ते, विकासकामांसाठी खोदकाम आणि कुचकामी प्रवाशी वाहतूक यंत्रणेमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यातच गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता कोरेगाव पार्क, जंगली महाराज, रस्ता, बाणेर, चतुःशृंगी, स्वारगेट, मार्केटयार्ड, हडपसर, कोथरूड परिसरात वाहतूक कर्मचाऱ्याना रात्रपाळी करावी लागणार आहे.

नियमनाला गती

एरवी बहुतांश चौकात रात्री दहानंतर वाहतूक वर्दळ कमी झाल्यानंतर मॅन्युअल सिग्नल यंत्रणा कार्यन्वित होते. मात्र, कोरेगाव पार्क, चतुःशृंगी, स्वारगेट, जंगली महाराज रस्ता परिसरासह काही वर्दळीच्या ठिकाणांवर रात्री एकवाजेपर्यंत सिग्नल सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्याना तीनशिफ्टमध्ये काम करून वाहतूक नियमनाला गती द्यावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...