आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिसांची धडक कारवाई:एकाच दिवशी गुटखा विरोधी कारवाई करत 17 गुन्हे दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून गुटख्यावर बंदी असतानाही ठिकठिकाणी गुटखा विक्रि जाेरात सुरु असल्याने त्यावर कारवाई करण्यात येत आहे. गुरवारी एकाच दिवसात गुटखा विक्रेत्यावर 25 गुन्हे शहरभरात दाखल झालेले असताना, पुन्हा दुसऱ्या दिवशी गुटखा विक्रीवर कारवाई करत 17 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिलेली आहे.

भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, खडकी, वानवडी, हडपसर,काेंढवा,शिवाजीनगर, लाेणीकाळभाेर आदी पोलिस ठाण्याचे हद्दीत पोलिसांनी छुप्या पध्दतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन माेठया प्रमाणात गुटख्याचे साहित्य जप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखुजन्य पदार्थ व पानमसाला हा मानवी आराेग्यास अपायकारक पदार्थ विक्री करीता बेकायदेशीररित्या विक्रीसाठी जवळ बाळगल्याने संबंधितांवर कारवाई करुन गुटखा साहित्य जप्त करुन आराेपींना गजाआड करण्यात आलेले आहे. कोंढवा परिसरात जीतलाल यादव (वय 39) याला पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून एक लाख 26 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. तर उत्तमनगर परिसरात संतोष देवी प्रजापती (वय 27 )या महिलेवर कारवाई करून एक लाख 78 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हडपसर भागात शेवाळेवाडी येथे मुकेश गुप्ता( वय 44) याच्या ताब्यातून 13 हजारांचा तर दुर्गेश कुमार श्रीवास्तव (वय 36) याच्या ताब्यातून 10 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांना एफ.सी.रस्त्यावर ज्ञानेश्वर पादुका चाैकात तीन फेब्रुवारी राेजी रात्री गुटखा विक्रीचा एक टेम्पाे येणार असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार एपीआय भाेलेनाथ अहिवळे यांचे पथकाने सदर भागात सापळा रचून संबंधित वर्णनाचा टेम्पाे आला असता, टेम्पाेचालक ज्ञानेश्वर जगताप (वय-28,रा.कर्वेनगर,पुणे) यास अटक केली. त्याच्याकडील तपासात 39 हजार रुपयांचा प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा व अडीच लाख रुपयांचा टेम्पाे असा दाेन लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...