आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना आणि नाइट कर्फ्यूमुळे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

31 डिसेंबरला पुण्यात होणाऱ्या एल्गार परिषदेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी परिषदेला परवानगी नाकारल्याचे समजत आहे. माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून एल्गार परिषद घेऊ, असे म्हटले होते. पण, पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीत एल्गार परिषदेला परवानगी देता येणार नाही, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला आहे.

डिसेंबर 2017 मध्ये शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर कोरेगाव-भीमामध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आले होते. शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा गोंधळ झाला.

बातम्या आणखी आहेत...