आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथक एक आणि दाेन यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळया कारवाई करुन एकूण पावणेचार काेटी रुपयांचे 823 किलाे अंमली पदार्थ जप्त केले आहे. सदर अंमली पदार्थाची पोलिसांकडून भट्टी जाळून विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेकळे यांनी दिलेली आहे.
पोलिसांनी वेगवेगळया कारवाई करत जप्त केलेल्या अंमली पदार्थात एमडी, एलएसडी, ब्राऊनशुगर, अफू, चरस, गांजा, मॅफेड्राेन, काेकेन यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये 823 किलाे अमंली पदार्थांपैकी 818 किलाे गांजाचा समावेश आहे. चरस तीन किलाे 105 ग्रॅम, हेराॅईन एक किलाे 110 ग्रॅम, काेकेन 252 ग्रॅम, मेफेड्राॅन 113 ग्रॅम यांचा समावेश आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत पावणेचार काेटी रुपये आहे. पुणे शहरात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश आदी राज्यातून गांजाची सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून तस्करी माेळया प्रमाणात हाेते. पुणे, मुंबई येथे त्याची बेकायदेशीर विक्री करणारी साखळी तयार झाल्याचे पोलिसांचे तपासात उघडकीस आलेले आहे. गांजा साेबतच काेकेन, मेफेड्राेन या अंमली पदार्थांना ही माेठया प्रमाणात मागणी असल्याचे अंमली पदार्थाच्या वेळाेवेळीच्या कारवाईतून समाेर आलेले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या हालचालींवर पोलिस लक्ष्य ठेऊन आहे. महाविद्यालयीन तरुण, तरुणींना अंमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे.
पोलिसांनी जप्त केलेले पावणेचार काेटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ हे न्यायालयाच्या आदेशानुसार ड्रग डिस्पाेजल कमिटीसह, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे उपस्थितीत मुंढवा येथील भट्टीत नष्ट केले जाणार आहे. पुणे पोलिसांनी सन 2021 मध्ये अशाचप्रकारे 680 किलाे अंमली पदार्थांची हाेळी केली हाेती. सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पाेकळे, पोलिस उपायुक्त अमाेल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थाेपटे यांचे पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.