आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्याच्या चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हॉकीचे राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या 37 वर्षीय पोलिस अधिकाऱ्याचे निधन झाल्याने पुणे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
सोनू सकट (वय -37) असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
हृदयविकाराचा झटका
पोलीस अमलदार सोनू सकट हे चतुःशृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून ते अर्जित रजेवर होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारादरम्यान हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सकट यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या निधनामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचार्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात आठ एप्रिलला रात्री सव्वा दहाच्या सुमारास हडपरसरमध्ये घडला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
ऋषीकेश बाबासाहेब डोंगरे (वय- 20 रा. शेवाळवाडी ,पुणे) असे ठार झालेल्याचे नाव आहे. बाबासाहेब डोंगरे (वय- 46 ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,ऋषीकेश आठ एप्रिलला रात्री सव्वा दहाच्या सुमारास दुचाकीवरुन शेवाळवाडी भाजी मार्केट परिसरातून जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने त्याला धडक दिली. खाली पडल्यामुळे ऋषीकेश गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.