आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे कोरोना:बिबडेवाडी परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा, रस्त्यावरच करायला लावला योगा

पुणेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात बळींचा आकडा 188 वर

पुण्यातील बिबडेवाडी परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पोलिसांनीच पकडून चांगलाच धडा शिकवला. लॉकडाउन असतानाही कथित आरोग्याची काळजी म्हणून जवळपास 70 लोक मॉर्निंग वॉक करत होते. पोलिसांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्या सर्वांना पकडण्यात आले. यानंतर त्यांना रस्त्यावर आणि फुटपाथवर चक्क योगाच करायला लावले. लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडू नये असे वारंवार सांगूनही लोक सूचनांवर दुर्लक्ष करतात. अशाच प्रकारे ठाणे येथे सुद्धा नुकतेच मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता.

महाराष्ट्रात बळींचा आकडा 188 वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. राज्यात आज (गुरुवार) 165 नवे रुग्ण मिळाले. यामध्ये मुंबई 107, पुणे 19, ठाणे 13, नागपूर 11 नवीन मुंबई आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी 2, पिंपरी-चिंचवड आणि मालेगाव, अहमदनगर, चंद्रपूर आणि पनवेलमध्ये प्रत्येक 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे. यासोबत राज्यातील संक्रमितांची संख्या 3081 वर पोहोचली आहे. पुण्यात रात्री उशिरा एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यासोबत पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 44 लोक मृत्युमुखी पडले आहेत. यासोबतच राज्यातील बळींची आकडा 188 वर पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...