आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह विधान भोवले:अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल, नेहरू-गांधी परिवाराविषयी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी अडचणीत सापडली आहे. पुणे पोलिसांत पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे जिल्हा काँग्रेसच्या कमिटी सरचिटणीस असलेल्या संगीता तिवारी यांनी पायल रोहतगी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पायल रोहतगी हिने एस व्हिडीओ तयार केला असून त्यात काँग्रेस पक्ष, नेहरू गांधी परिवाराबाबत खोटा आणि बदनामीकारक वक्तव्य केले असल्याने संगीता तिवारी यांनी पायल विरोधात तक्रार दाखल केली आहे.

संगीता तिवारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, पायल रोहतगीने तयार केलेल्या व्हिडिओत पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत चुकीचे तसेच आक्षेपार्ह विधान केले आहे. हा व्हिडिओ मी स्वत: पाहिला असून त्यानंतर तक्रार दाखल करत आहे.

बातम्या आणखी आहेत...