आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसेवाला हत्या प्रकरण:बिश्नोईच्या चौकशीसाठी पुणे पोलिस दिल्लीमध्ये , संतोष जाधवच्या तपासासाठी पोलिस पथके चार राज्यांत रवाना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुख्यात गुन्हेगार लाॅरेन्स बिश्नोई कारागृहात

राजस्थानमधील कुख्यात गुन्हेगार लाॅरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील मंचर येथे राहणारा गुन्हेगार संताेष जाधव संशयित आराेपी आहे. त्याचा ठावठिकाणा शाेधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक शुक्रवारी दिल्लीत बिश्नोई याच्याकडे चौकशीसाठी गेल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिली.

दरम्यान, आरोपी संतोष जाधव याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके गुजरात, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली या चार राज्यांत रवाना करण्यात आली आहेत.

मंचर येथे ऑगस्ट २०२१ मध्ये ओंकार बाणखेले या २६ वर्षीय तरुणाचा खून संताेष जाधव व त्याच्या साथीदारांनी केला होता. त्यानंतर जाधव हा पसार झालेला असून ताे अद्याप सापडला नाही. राजस्थानमधील लाॅरेन्स बिश्नोई टाेळीच्या संर्पकात ताे असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांच्या एक पथकाने राजस्थानमध्ये त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, संताेष जाधव याचा साथीदार सौरभ महाकाल यास पोलिसांनी संगमनेर येथून चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. मुसेवाला प्रकरणात महाकाल हादेखील संशयित आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पंजाब पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पोलिसातील सूत्रांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर साधला कोडवर्डमध्ये संवाद
आरोपी सौरभ महाकाल याच्या चौकशीदरम्यान त्याने सोशल मीडियावर चार ते पाच अकाउंट बनवल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कोडवर्डमध्ये संवाद साधत असल्याची बाब पुढे आली आहे. या दृष्टीने पोलिस या सोशल मीडिया खात्यांची तपासणी करत आहेत. संतोष जाधव आणि सौरभ महाकाल या दोन आरोपींच्या संपर्कात महाराष्ट्रातील आणखी कुणी व्यक्ती आहेत का, याबाबत तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत. सौरभ महाकाल राजस्थान आणि पंजाबमध्ये ये-जा करत असल्याचीही बाब चौकशीत स्पष्ट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...