आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थकारणासाठी:पुणे : 97% रस्त्यांवरील पोलिस बंदाेबस्त हलवला, व्यवहार सुरळीत करण्याचा प्रशासनाचा निर्णय

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईसह पुणे शहरात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळले होते. नंतरच्या काळात पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून चार हजारांचा टप्पा पार झाला अाहे. मात्र, लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतरही ही संख्या आटोक्यात आणण्यात अद्याप यश आले नाही. त्यामुळे अर्थकारणाला गती देण्यासाठी प्रशासनाने आता फक्त कंटेनमेंट झोनमधीलच निर्बंध कडक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील खुल्या केलेल्या ९७ टक्के रस्त्यावरचा बंदोबस्त हलवला आहे. पुण्यातील रस्त्यावरच्या वाहतुकीवर आता पोलिस नियंत्रण ठेवणार नाहीत. यामुळे शुक्रवारी रस्त्यावर कोठेही पोलिस बंदोबस्त दिसला नाही. मात्र, अप्पा बळवंत चौक आणि मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स तसेच होते तर बाजीराव रस्त्यावरील बॅरिकेड्स अभिनव चौकात नागरिकांनी स्वत: हटवून रस्ता खुला केला होता. अलका चौकातील बॅरिकेड्स पोलिसांनी स्वत: काढून रस्ता वाहतुकीस खुला केला.

व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात दुकानांना परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर पुण्यात अनेक भागांत दुकानेही सुरू झाली आहेत. नागरिक हळूहळू खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दृश्‍य दिसत होते. काही भागातील मिठाई, भेळ आदींची दुकानेही खुली होती. ज्या व्यवसाय आणि दुकानांना परवानगी दिलीय त्याची वेळ सकाळी ९ ते ५ राहणार असून रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू आहे. मात्र, बाजारपेठेत हवी तशी गर्दी नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीनंतर पुणे महापालिकेने लॉकडाऊन चाैथ्या टप्प्यात काेणत्या सुविधा, दुकाने सुरू करणार, काय बंद राहणार याची माहिती जारी केली.

अतिसंक्रमणशील भागात अत्यावश्यक वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

नव्या नियमावलीनुसार आता रेड आणि नॉन रेड झोन अशी विभागणी करण्यात आली अाहे. कंटेनमेंट झोनचीही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट झोन अशी विभागणी झाली आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात अतिसंक्रमणशील भागात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सेवा, सुविधा बंदच राहणार आहेत. दरम्यान, रस्त्यावर वाहतूक हळूहळू वाढू लागली आहे. मात्र, अद्यापही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यक पडेल इतकी वाहतूक वाढलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...