आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे लाेहमार्ग मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक यांच्या नावाचा गाेल शिक्क्याचा तसेच त्यांच्या खाेटया सहीचा वापर करुन स्वत:चे फायद्यासाठी बनावट पत्र एका पोलिस कर्मचाऱ्याने तयार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी पुणे लाेहमार्ग मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत दत्तात्र्य भाेसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस शिपाई एस साेनवणे याचेवर खडकी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
सदरचा प्रकार सात नाेव्हेंबर 2022 राेजी साडेपाच वाजता घडलेला आहे. पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत भाेसले यांचे कार्यालयात आराेपी पोलिस शिपाई एस साेनवणे काम करत आहे. त्याने घटनेच्या दिवशी भाेसले यांचे पोलिस उपअधीक्षक कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करुन कुलुप उघडले. चंद्रकांत भाेसले व पोलिस अधीक्षक लाेहमार्ग पुणे या नावाचा गाेल शिक्क्याचा तसेच त्यांच्या खाेटया सहीचा वापर करुन स्वत:चे फायद्यासाठी बनावट पत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवून दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलचे व्यवस्थापकांना देऊन त्यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास खडकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस वालकाेळी करत आहे.
ईमेल आयडी हॅक करुन 77 हजारांचा गंडा
पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रस्त्यावर माॅरगेज कार्ट ही कंपनी असून सदर कंपनीतील मालकाचा ईमेल आयडी अज्ञात आराेपीने हॅक करुन त्यांचे ईमेलवरुन कंपनीचे अकाऊंट विभागाचे कामकाज पाहणाऱ्या अश्विनी रवींद्र घुरे (वय-34) यांना मेसेज करुन पैशाची मागणी करत 77 हजार 700 रुपये ऑनलाईन पध्दतीने मागवून घेण्यात येऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सदरचा प्रकार 14/12/2022 राेजी घडला असून याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात युआरएल धारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.