आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टेबाज ताब्यात:पुण्यात आयपीएल मॅचवर बेटिंग करणारे 9 जणांना पोलिसांनी केली अटक, कोंढवा भागातून पाच लाखांचा माल जप्त

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात आयपीएल मॅचदरम्यान मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करणाऱ्या नऊ जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेने छापेमारी करत अटक केली. शनिवारी रात्री पोलिसांनी कोंढवा परिसरात ही कारवाई केली.

पाच लाखांचा माल जप्त

या प्रकरणात नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 कॉम्पयुटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट, 92 हजार रूपये रोख असा एकुण 5 लाख 12 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. एकच वेळी क्रिकेट बॅटिंग वर सट्टा घेणाऱ्या नऊ जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेमंत रविंद्र गांधी, अजिंक्य शामराव कोळेकर, सचिन सतीश घोडके, धर्मेंद्र संगमलाल यादव, रींगलं चंद्रशेखर पटेल, अनुराग फुलचंद यादव, इंद्रजित गोपाल मुजुमदार,यशप्रताप मनोजकुमार सिंह,सतीश संतोष यादव अशी अटक केलेल्या आरोपीची नाव आहेत.

MI vs CSK मॅचवर सट्टा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील ब्रम्हा आंगण बी/ 2, फ्लॅट नं. 6 येथे काही बुकी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती.

याबाबत माहितीची खातरजमा पोलिसांकडून करण्यात आली.त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शखाली एसीपी सुनिल पवार, व.पो.नि. बहिरट, पोलिस उपनिरीक्षक पवार, पीएसआय पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढव्यात संबधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्याठिकाणी नऊ जण आयपीएलच्या मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले आहे.