आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्षिरसागर वस्ती येथे राहणाऱ्या अशोक अंकुश व्यवहारे (वय -43) यांच्या घरातील तब्बल आठ लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्यानी घरफोडी करत चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने तपास करत, दोन आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून तब्बल पावणे नऊ लाखांचे दागिने जप्त केल्याची माहिती सोमवारी दिलेली आहे.
सागर अरुण राऊत ( रा.टेंभुर्णी कोष्टी गल्ली ,तालुका- इंदापूर ,जिल्हा -पुणे )आणि दादाभाई शेंडगे (वय- 21, रा.साठे ल, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे )या आरोपींना अटक केली आहे. आरोपीं विरोधात इंदापूर पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 4 मार्च रोजी तक्रारदार अशोक व्यवहारे हे कुटुंबासह बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरातील दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून घरातील कपाटातून साडेसतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
याप्रकरणी इंदापूर ठाणे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करणे बाबत सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून व तांत्रिक विश्लेषण करून सखोल तपास करत आरोपी सागर राऊत आणि दादा शेंडगे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडून चोरीस गेलेले पावणे नऊ लाख रुपये किमतीचे साडेसतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश पवार करत आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार , साह्याक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलिस हवालदार प्रकाश माने ,पोलिस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलिस नाईक सलमन खान ,लखन साळवे, नंदू जाधव ,लक्ष्मण सूर्यवंशी , एस खंडागळे यांच्या पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.