आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिसांची कारवाई:वाहन चोराकडून 23 लाख रुपयांच्या तब्बल 45 दुचाक्या हस्तगत; 34 गुन्ह्यांची उकल

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विविध भागात दुचाकींची चोरी करणारी तसेच घरफोडी करणारी आंतराज्यीय टोळीला गजाआड करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आळेफाटा पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 लाख रुपयांच्या तब्बल 45 दुचाक्या हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे 34 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना शुक्रवारी यश आले आहे.

आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्रमोद लक्ष्मण सरकुंडे, ज्ञानेश्वर रंगनात बिबवे, गणेश फक्कड कारखिले, मुख्तार अहमद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

गुंजाळवाळी येथून 29 मे रोजी दुपारी शांताबाई बबन पावडे या नगर कल्याण महामार्गावर उभ्या असतांना एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने ओढून लंपास केले होते. या प्रकरणाचा आळेफाटा पोलिस तपास करत होते. पोलिसांनी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, राजूरी, गुंजाळवाडी, बेल्हे या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेतला. आरोपी हे निघोजेचे असल्याचे पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी सुरुवातीला प्रमोद सरकुंडे याला अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, सरकुंडे याच्यावर 2021 मध्ये तोफखाणा पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तसा तपास केला. यावेळी त्याने साथीदार बिबवे, कारखिले आणि कुरेशी यांच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तब्बल 45 दुचाक्या चोरल्या. या गाड्यांची किंमत 23 लाख रुपये आहे. या मुळे 34 गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...