आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Police Seizise 2 Crore | Another Rs 2 Crore From The Robbery Seized By The Pune Rural Police | The Three Who Escaped Were Arrested

दरोड्यातील आणखी 2 कोटी रुपये पुणे ग्रामीण पोलिसांकडून जप्त:राजस्थानात पळून गेलेल्या तिघांना अटक

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंगडीयाच्या गाडीवर गोळीबार करत दरोडा टाकून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपयांची रोकड लुटल्यानंतर तिघांकडून 1 कोटी 43 लाखांची रोकड ग्रामीण पोलिसांनी जप्त केली होती. दरम्यान राजस्थान येथे पळून गेलेल्या तिघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडेही इंदापूर पोलिसांना मोठे घबाड मिळाले असून त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 1 लाख 10 हजारांची रोकड जप्त केली आहे. असे गुन्ह्यात चोरी केलेल्या रकमेपैकी तब्बल 3 कोटी 44 लाख 30 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

गौतम अजित भोसले (33, रा. वेने, म्हाडा, जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (26) आणि भूषण लक्ष्मीकांत तोंडे (25, दोघही रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याकडून 2 कोटी 1 लाख 10 हजारांची नव्याने रोकड जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेल्या सागर शिवाजी होनमाने (वय 34), बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय 32, राहणार दोघे कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रजत अबू मुलाणी (वय 24, रा. न्हावी, ता. इंदापुर) या कुर्डूवाडी परिसरात ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्याकडील तपासात पोलिसांनी तब्बल 1 कोटी 43 लाख 20 हजारांची दरोडा टाकलेली रोकड जप्त केली होती.

यामध्ये होनमाने यांच्याकडून 72 लाख, मुलानी याच्याकडून 71 लाख 20 हजार, गौतम भोसलेकडून 71 लाख 60 हजार, किरण घाडगे कडून 60 लाख तर भूषण तोंडे याच्याकडून 69 लाख 50 हजार अशी एकूण 3 कोटी 44 लाख 30 हजारांची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.

तिन्ही आरोपींना अटक

दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कुर्डूवाडी व राजस्थान येथील उद्ययपुर परिसरातून जेरबंद केले होते. दरम्यान अटक केलेल्या तिघांना आता इंदापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केले असून त्या तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यात फिर्याद

26 ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास इंदापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरकुटे पाटी पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर घडली होती. याप्रकरणी अंगडीया भावेशकुमार अमृत पटेल (रा.कहोडा,जि. मेहेसाना, राजस्थान) यांनी इंदापुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बातम्या आणखी आहेत...