आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्येचे गुढ कायम:पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांची पथके यवतमाळमध्ये

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला दहा दिवस झाले असताना अद्याप आत्महत्येचे गुढ कायम आहे. पोलिसांची पुण्यातून पाठविण्यात आलेली पथके ही यवतमाळमध्ये तसेच इतर तपासाच्या अनुषंगाने बाहेरच असल्याची माहिती पोलिसातील सूत्रांनी दिली. परंतु, यामध्ये नेमका काय तपास केला व काय तपास सुरू आहे याबाबत कमालीची गोपनीयता पोलिसांकडून पाळण्यात येत आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोणालाही ताब्यात घेतले नसल्याचे सांगितले. तसेच इतर काही बोलण्याचे टाळत केवळ तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी दोन व्यक्तीमधील संभाषणाच्या ऑडीओमध्ये पूजावर उपचार सुरू असल्याची बोलणे आहे. तसेच तिच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार केल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांची पथके यवतमाळ येथील कोणत्या रुग्णालयात चौकशीसाठी तर गेली नाहीत ना ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर दुसरीकडे अद्याप पोलिस पथकाच्या हाती काहीच लागले नसल्याचे समजते. दरम्यान, पुण्यातील एका वकील संघटनेने या प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून आत्महत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

यवतमाळचे डॉक्टर गायब
यवतमाळ मधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांनी पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा पाच फेब्रुवारी रोजी गर्भपात केला होता. पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ही तिचा सहकारी म्हणून अरुण राठोड हे नाव समोर आले आहे. त्यामुळे ही महिला काेण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान,पूजा राठोड हिचा गर्भपात केलेले डॉक्टर पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या पासून गायब असून त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...