आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Police Strike Action Arrests Bogus Company Director Who Looted In The Name Of Loan; A Case Has Been Registered Against Three

पुणे पोलिसांची धडक कारवाई:कर्जाच्या नावाने लुटणाऱ्या बोगस कंपनीच्या संचालकाला अटक; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात 1 ते 100 कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या आमिषाने तारण म्हणून लाखों रुपय घेऊन फसवणूक करणाऱ्या जलाराम एन्टरप्रायझेजेस लिमिटेड या बोगस कंपनीच्या संचालकला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका यंतिश आंबेकर( रा.मुंबई), संदीप रामचंद्र समुद्रे(37, रा.कल्याण, ठाणे), जायजित रामसनेही( रा.मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी श्रीराम प्रल्हाद पिंगळे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,श्रीराम पिंगळे यांचा मित्र जयेश पाटील याने जलाराम एन्टरप्रायझेजेस लिमिटेड हे व्यवसायासाठी 1 कोटी पासून ते 100 कोटी पर्यन्तचे कर्ज देत असल्याची जाहिरात दाखवली. त्यानुसार त्यांनी त्या कंपनीच्या मॅनेजरशी संपर्क साधला. संबंधित मॅनेजरने त्यांना पुण्यातील बाणेर येथील कार्यालयात बोलावून चर्चा केली. यावेळी त्यांनी एक कोटी रुपये कर्ज देतो असे फिर्यादीला सांगितले. पण त्यासाठी तारण म्हणून पाच लाख रुपये द्यावे लागेल अशी अट आरोपी मॅनेजर राधिका आंबेकर हिने घातली. या नंतर 45 दिवसांत तुम्हाला लोन मिळेल असे तिने सांगितले. दरम्यान, फिर्यादिला या कंपनीचा संशय आला. ही कंपनी फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यावर, त्यांनी याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. आरोपी संदीप समुद्रे ही कंपनी चालवत होता.

ऑफिस उघडून फसवणुकीचा गैरप्रकार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ .विवेक मुगळीकर म्हणाले, सपोनी राम गोमारे म्हणाले, हिंजवडी पोलिस याबाबत तपास करत असताना, त्यांनी सदर कंपनीत फोन करून कर्जाची मागणी केली. यावेळी त्यांनाही ही कंपनी विश्वासपात्र नसल्याचे आढळले. या नंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पथक तयार करून या कंपनीच्या बाणेर येथील कार्यालयात गेले. यावेळी मॅनेजर राधिका आंबेकर हिला त्यांनी विचारपूस केली. यावेळी कंपनीची नोंदणी झाली नसल्याचे त्यांना दिसून आले. तसेच या ठिकाणी काम करण्याऱ्या सात महिलांना अपॉइंटमेंट लेटर न देता काम करून घेत असल्याचे आढळले.

पोलिसांनी छापा टाकत संबंधित घटनास्थळावरून 13 कॉम्प्युटर, 7 मोबाइल, दोन कर्ज प्रकरणातील कागदपत्रे जप्त करत राधिका आंबेकर या महिलेला अटक केली आहे. तसेच तिचे दोन साथीदार यांनाही मुंबईतून अटक करण्यात आली. हे तिघे भामटे पुण्यात आणि मुंबईत नागरिकांची फसवणूक करत होते. वाशी याठिकाणी ही त्यांनी ऑफिस उघडून अशाचप्रकारे फसवणूक केली असल्याचे तपासात समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...