आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:तरुण म्हणाला, मी घराबाहेर पडलाे तर काय कराल?; पोलिसांनी सुनावले, तुला उचलून आत टाकले तर?

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे पोलिसांचा लॉकडाऊनमध्ये ‘फन डे’ साजरा, लोकांच्या प्रश्नांना दिली उत्तरे

काेरोना नाहीसा करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. आपले पोलिस अहोरात्र रस्त्यावर तसेच सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना धडा शिकवत आहेत. सोशल मीडियावर बाष्कळ मजकूर लिहिण्यांना धडाही शिकवत आहेत. पुणे पोलिसांनी रविवारी टि्वटरवर फन डे साजरा केला. या वेळी त्यांनी पझल गेमही खेळला. लोकांकडून उत्तरेही मागवली. लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. सुहास पाटील याने पुणे पोलिसांना टॅग करून लिहिले, जर मी बाहेर आलो तर.... यावर पुणे पोलिसांनी उत्तर दिले, तुला आतमध्ये टाकले तर... विनाकारण आत टाकणेही योग्य नसते. मग विनाकारण बाहेर फिरणे योग्य आहे काय? या उत्तरामुळे सोशल मीडिया यूजर्स खूप खुश झाले. 

पोलिसांच्या पझल गेमवर रुची या तरुणीने म्हटले, तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली तर बक्षीस म्हणून आंबे मिळतील काय? पोलिसांनी उत्तर दिले , पुणेकर खूप खास आहेत. केवळ आंबे देऊन काम भागणार नाही. पुणे पोलिसांचे टि्वटस खूप उद्बोधक व रंजक असतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांचे टि्वटर हँडलचे फॉलोअर्सही वाढले आहेत.

टि्वटर सांभाळणारीशी लग्न करू इच्छितो

स्वामीने पुणे पोलिसांना टॅग करून म्हटले, तुमचे टि्वटर हँडल सांभाळणारी महिला आहे का? महिला असेल तर मला तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याची ठेवण्याची इच्छा आहे. मी पत्नीसाेबत स्पेस ट्रॅव्हल करण्याची योजना अाखतो आहे. पोलिसांनी म्हटले, ‘तुमचे प्रपोजल फेटाळणे खूप अवघड आहे. कारण येथील महिलेसोबत पुरुष कर्मचारीही असतात. तुम्हाला पुण्याची सफर नक्कीच घडवून आणतील. ’

बातम्या आणखी आहेत...