आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद कामगिरी:पोलिसांच्या धाडसामुळे महिलेचे प्राण वाचले, कॅनॉलमध्ये उडी मारलेल्या महिलेचे पोलिसांनी वाचवले  प्राण

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंहगड रोडवरील तुकाई नगरात आज सकाळी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारली. हे लक्षात येताच पुणे पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन महिलेचे प्राण वाचवले आहेत. 27 वर्षीय महिलेचे प्राण वाचविणाऱ्या पोलिस हे सिंहगड ठाण्यातील पोलिस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलिस शिपाई लक्ष्मण काशीद यांनी केली आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सिंहगड रोड परिसरात शैलेश नेहरकर आणि लक्ष्मण काशीद हे कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना एमडीटीवर 10 वाजून 58 मिनिटांनी कॉल आला की, तुकाई नगर येथील कॅनॉलमध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून ताबडतोब पोलिसांनी मदत करावी. यावेळी दोघांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी महिला कॅनॉलजवळ उभी असलेली पोलिसांना दिसली. मात्र पोलिसांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने पोलिसांचे ऐकले नाहीच आणि कॅनॉलमध्ये उडी घेतली. यावेळी जीवाची परवा न करता काशीद यांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली आणि जमलेल्या लोकांच्या मदतीने महिलेचे प्राण वाचवले आहे. यावेळी पोलिसांनी तिच्याशी चर्चा करत असताना अग्निशमन दलशी संपर्क करत त्यांची मदत मागवली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...