आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिसांची धडक कारवाई:मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या म्होरक्यासह दोघांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खुनाच्या प्रयत्नानंतर तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई झाल्यापासून फरार असलेल्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने बेड्या ठोकल्या.

सोन्या उर्फ राज रविंद्र भवार (22) आणि गौरव सुनिल कदम (22, दोघेही रा. धानोरी, विश्रांतवाडी,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, मोक्का तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 डिसेंबर रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी रविद्र फुलपगारे, प्रमोद सोनावणे व राजेंद्र लांडगे यांना गुन्ह्यात फरार असलेला म्होरक्या सोन्या भवार हा चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्याचा साथीदार अकलूज येथे असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्याला अकलूज येथील हॉटेल सुभाष बिअरबार येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्या

ला पुढील तपासासाठी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये घरफोडी

बंद घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी 4 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 18 डिसेंबरला पहाटे सव्वापाचच्या सुमारास कल्याणीनगरमधील कारनेशन सोसायटीत घडली. याप्रकरणी गौरव चमेली (वय 37 रा. कल्याणीनगर ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव आणि त्यांचे शेजारी थोकुर चौटा हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उचकटून गौरव यांच्या घरातील 2 लाख 80 हजारांचा ऐवज आणि थोकुर यांच्या घरातील 1 लाख 20 हजारांचा ऐवज मिळून 4 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डोंबाळ तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...