आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात साडेसात लाखांचे अमली पदार्थ जप्त:रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला बेड्या; वेगवेगळ्या भागात घर बदलून रहायचा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने येरवडा परिसरात अंमली पदार्थ रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून 7 लाख 88 हजार रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांनी शनिवारी दिली आहे.

आरोपी मुळ मुंबईचा

संबंधित आरोपी हा मुळचा मुंबईतील असून मागील चार वर्षांपासून तो पुण्यातील वेगवेगळया भागात घर बदलून राहत आहे. अंमली पदार्थाचा व्यवसाय करताना पोलिसांना मिळून येऊ नये याकरिता तो झोपडपट्टीत भाडयाने खोली घेऊन राहत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. याप्रकरणी समीर आयबा शहाजहान शेख या आरोपीस अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे पथकास येरवडा परिसरात पेट्रोलिंग करताना माहिती मिळाली होती की, येरवडातील पर्णकुटी पायथा येथे सार्वजनिक रस्त्यावरल अंमली पदार्थ रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख संशयितरित्या फिरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली.

पुण्यात चार गुन्हे दाखल

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सात लाख 81 हजार रुपये किंमतीचे 52 ग्रॅम 090 मिलिग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ, पाच हजार रुपये रोख, एक वजन काटा, मोबाइल फोन, प्लॅस्टिक पिशव्या असा एकूण 7 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याच्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात एनडीपीसी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी पुण्यात अंमली पदार्थाचे चार गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...