आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:आंतरराज्य विमा पॉलिसी फ्रॉड करणाऱ्या सराईत आरोपीस अटक

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील नामांकित डॉक्टर यांची पॉलिसी देण्याच्या बहाण्याने सन 2013 पासून आतापर्यंत वेगवेगळ्या मेल आयडी व कॉलिंगसाठी मोबाईल नंबरचा वापर करून वेगवेगळ्या 18 बँकेचे 41 बँक खात्याचा वापर करून तक्रारदार यांना पॉलिसीचे पैसे परत करून देतो असे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडवले. हा प्रकार पुण्यात काही दिवसांपूर्वी घडला. यात एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

वारंवार वेगवेगळे बँकेच्या खात्यावर पैसे भरायला सांगून एकूण दोन कोटी दीड लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आंतरराज्य विमा पॉलिसी फ्रॉड करणारे सराईत आरोपीस दिल्ली येथूनअटक केली आहे.

शहवान पुत्र सलिम अहमद (लक्ष्मीनगर,दिल्ली) याला आग्रा येथील सायबर पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातून वर्ग करून तेथील स्थानिक न्यायालयाची परवानगी घेऊन पुणे सायबर पोलीसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे. यापूर्वी संदिपकुमार पुत्र धर्मपाल (रा. लक्ष्मीनगर गार्डन, लोणी, गाझीयाबाद), साहिब खान पुत्र नसीर अली (रा. कासगंज) आणि तुआजिब खान पुत्र अकील अहमद (रा. विढौणा कासगंज) अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी सहायक पोलिस आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ निरीक्षक मिनल सुपे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, अमंलदार प्रविणसिंह रजपुत, वैभव माने, अमोल कदम, किरण जमदाडे, यांनी ही कामगिरी केली आहे. अशाप्रकारे विमा पॉलिसीचे बहाणा करून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांपासून सावध राहण्याबाबत सायबर पोलीस स्टेशन यांच्याकडून आव्हान करण्यात आले आहे.