आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दिवसाढवळ्या थरार:तरुणाने जाहिरातीच्या 35 फूट उंचीच्या बोर्डवरुन मारली उडी, लोक पाहत राहिले तमाशा, पाहा घटनेचा धक्कादायक व्हिडिओ

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी एक अतिशय भीषण घटना घडली आहे. येथे एका तरुणाने बस स्टँडला लागून असलेल्या भिंतीजवळील जाहिरात बोर्डवर चढून उडी मारली. सुमारे 35 फूट उंच बोर्डवरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील ससून सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते अयशस्वी राहिले.

मानसिक आजाराने त्रस्त होता व्यक्ती
त्या व्यक्तीला खांबावर चढताना पाहून कोणीतरी पोलिसांना फोन केला, त्यानंतर कसबा अग्निशमन दलाची एक टीम अवघ्या 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. ते त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करत असताना त्याने अचानक उडी मारली. तपासात समोर आले आहे की, हा व्यक्ती मानसिक आजारी होता आणि एक दिवस आधी घरातून गायब झाला होता.

अग्निशमन दलाने त्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी खूप प्रयत्न केला.
अग्निशमन दलाने त्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी खूप प्रयत्न केला.

डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी सातव यांनी सांगितले की, उंचीवरून खाली पडल्याने त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर सांगितले की तो धोक्याबाहेर आहे, पण त्याला पूर्ण बरे होण्यासाठी काही दिवस लागतील.

बातम्या आणखी आहेत...