आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा हाहाकार:पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पाेल्ट्रीत पाणी शिरल्याने हजाराे काेंबडया मृत्यमुखी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हयात बुधवारी रात्री गणेशाेत्सवाच्या आगमनासाेबतच पावसाने दमदार हजेरी लावली. जुन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्ते, शेतीत ओढे-नाले यांनी राैद्ररूप धारण केले.

अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसाचे पाणी पाेल्ट्रीत शिरल्याने हजाराे काेंबडया दगावल्याची घटना घडली आहे. सणासुदीच्या काळात नुकसान झाल्याने शेतकरी व पाेल्ट्री व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

मोठे नुकसान झाले

जुन्नर तालुक्यातील खामुंडी, गायमुखवाडी, उंब्रज, पिंपळपेढ अशा विविध गावात बुधवारी मध्यरात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने लाेकांची धावपळ झाली. गुरुवारी सकाळी पाणी ओसरले असले, तरी ढगसदृश्य पावसामुळे शेतातील पिकांचे, साठवून ठेवलेल्या धान्याचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पंचनामे झाले सुरू

पाण्याच्या प्रचंड वेगामुळे अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले त्याचसाेबत शेतीचे नुकसान झाले आहे. सदर पावसात जुन्नर येथील साेमटवाडी येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व्यावसायिकांच्या पाेल्ट्री फार्मचे ही नुकसान झाले आहे. याप्रकरणी पावसाच्या पाण्याने नुकसान झालेल्या पाेल्ट्री फार्मचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फेत पंचनामे करण्यात येत आहेत.

दरम्यान, गुरुवारी सकाळपासून शेतकरी घराच्या डागडुजी सोबतच शेतातील साफसफाई करताना सदर परिसरात आढळून येत आहेत. अचानक झालेल्या ढगफुटी पावसामुळे आमचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाचा अंदाज

पुणे हवामान खात्याने सांगितले आहे की, गुरुवारी दुपारपर्यंत उष्ण हवामान राहून तीव्र सूर्यकिरणांमुळे पावसाच्या ढगांची संध्याकाळपर्यंत निर्मिती हाेऊ शकते. त्यामुळे दुपारनंतर आकाशात वीजांचा कडकडाट पाहवयास मिळून पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविण्यातआली आहे. घाट परिसरात यॅलाे अर्लट देण्यात आला असून, त्याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी. त्याचसाेबत सण साजरा करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...