आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:आत्महत्येची धमकी देत बलात्कार अन् सक्तीने केले लग्न; त्यानंतर अश्लील व्हिडिओ काढून तरुणीला दिली बदनामीची धमकी

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका अल्पवयीन मुलीस दाेन वर्षापूर्वी आत्महत्येची धमकी देऊन तिच्याशी एका तरुणाने बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. मात्र, लग्नानंतर संबंधीत तरुणीचे अश्लील व्हिडिओ, फाेटाे काढून त्याआधारे तिला ब्लॅकमेल करुन संबंधित व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आराेपीवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती शुक्रवारी दिली आहे.

याबाबत भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात १९ वर्षीय पिडित तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आराेपी नागेश राजू चव्हाण (वय-२३,रा.आंबेगाव, पुणे) याचेवर पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना पिडिता अल्पवयीन असताना १४ फेब्रुवारी २०२१ ते सात फेब्रुवारी २०२३ यादरम्यान घडलेली आहे.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी व आराेपी नागेश चव्हाण यांची एकमेकांशी आेळख झालेली हाेती, त्यानंतर नागेश याने मुलीस तिच्याशी प्रेम असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला भारती विद्यापीठ परिसरातील शितल लाॅज याठिकाणी नेऊन आत्महत्येची धमकी देत त्याने तिच्यासाेबत जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. याबाबतचे फाेटाे, व्हिडिओ काढून त्याने त्याआधारे मुलीस ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करुन तिच्यावर वेळाेवेळी वारंवार बलात्कार केला.

दाेन फेब्रुवारी राेजी ताे मुलीच्या काॅलेज बाहेर भेटण्यासाठी आला व त्याने लग्न करण्यासंर्दभात मुलीकडे विचारणा केली. परंतु मुलीने त्यास नकार दिला असता , त्याने साेबत आणलेले फिनेल पिण्याचे नाटक करत आत्महत्या करत असल्याचे भासवले. त्यानंतर मुलीस साेबत घेऊन ताे साेलापूरला गेला. त्याठिकाणी तीन फेब्रुवारी राेजी त्याने रुपा भवानी मंदिर येथे लग्न केले.

मुलगी बहाणा करुन त्याच्या तावडीतून निसटली आणि साेलापूरहून पुण्यात वडीलांचे घरी आली. त्यानंतर आराेपीने तिला पुन्हा सासरी नांदण्यास ये असे म्हणू लागला परंतु तरुणीने त्यास नकार दिला असता, त्याने तु नांदण्यास आली नाही तर तुझे आक्षेपार्ह फाेटाे, व्हिडिओ व्हायरल करुन तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणीने आराेपी विराेधात भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पाेलीस उपनिरीक्षक एस ढमे पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...