आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात आणखी एक बलात्कार:फुटपाथवर आई-वडिलांजवळ झोपलेल्या 6 वर्षीय मुलीला रिक्षात उचलून निर्जन स्थळी नेले, मग केले अमानवीय कृत्य; आपोपी अटकेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर आता 6 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. पुण्यातील कात्रज परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी आज (गुरुवारी) बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नराधम आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

बंडगार्डन पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास कात्रज परिसरातील एका फुटपाथवर आपल्या आई वडिलांजवळ झोपलेल्या मुलीवर हा अत्याचार घडला. दिलेल्या फिर्यादीप्रमाणे, पीडित 6 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत फुटपाथवर राहते. नेहमीप्रमाणेच ती आपल्या आई-वडिलांजवळ फुटपाथवर झोपली होती. याच दरम्यान आरोपी रिक्षाचालक सागर मांढरे (39) याने मुलीला रिक्षात जबरदस्तीने उचलून नेले.

पीडितेच्या पालकांनी सांगितल्यानुसार, यानंतर रिक्षाचालकाने तिला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यानंतर आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात सविस्तर तपास पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...