आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरात लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत असलेल्या एका 30 वर्षीय तरुणाने प्रेयेसीच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर राहत्या घरी व इमारतीच्या टेरेसवर नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी काकासाहेब ऊर्फ सुरज व्यंकटेश शिंदे (वय- 30) या संशयित आरोपीवर वानवडी पाेलिस ठाण्यात बलात्कार व पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. यानंतर त्याला अटकही केली. अशी माहीती पोलिसांनी बुधवारी दिली.
ती म्हणत होती पप्पा!
याप्रकरणी पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेचा आराेपी सुरज शिंदे हा मित्र आहे. त्याच्यासाेबत ती एकत्र राहण्यास आहे. यादरम्यान आराेपीस महिलेची 13 वर्षीय मुलगी पप्पा म्हणत असून ती त्याचेवर विश्वास ठेवते.
संशयिताने उचलला फायदा
या गाेष्टीचा फायदा घेत तिच्या अज्ञानपणाचा व अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला त्याच्याकडे असलेल्या स्वीफ्ट कार मधून मागील तीन महिन्यापासून एका निर्जन ठिकाणी वारंवार नेऊन तीचेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच राहते घरी तीचे छातीला हात लावून तीचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी वानवडी पाेलीस पुढील तपास करत आहे.
जुगार अड्डयावर छापा, 26 जणांवर कारवाई
सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला. जुगार खेळत असलेल्या 26 जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. त्याठिकाणाहून 1 लाख 4 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपींविरूद्ध महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती बुधवारी देण्यात आली आहे.
मुंढवा परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथ्ज्ञकाने त्याठिकाणी छापा टाकून 25 जणांना ताब्यात घेतले. जुगार खेळण्यासाठी आवश्यक साहित्य, मोबाइल, रोकड असा 1 लाख 4 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अजय राणे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.