आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मतिमंद मुलीवर बलात्कार:जबरदस्तीने शारिरीक संबंध; पीडिता 6 महिन्यांची गर्भवती, आरोपीस पोलिसांकडून अटक

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका साेसायटीत घरकाम करणाऱ्या महिलेच्या 24 वर्षीय मतिमंद मुलीस घरात बाेलवुन तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध करुन तिला सहा महिन्यांची गर्भवती केल्याने ज्येष्ठ नागरिक आराेपीस अटक करण्यात आली आहे. शंकर अंकुश ताकमाेगे (वय-58) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

मतिमंद पणाचा घेतला फायदा

याप्रकरणी पीडित मुलीच्या 40 वर्षीय आईने मुंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, सदर प्रकार डिसेंबर 2021 मध्ये घडला आहे. आराेपी राहत असलेल्या साेसायटीत पीडित मुलीची आई सुरक्षारक्षकाचे काम करते तसेच साेसायटीतील लाेकांचे घरी धुणी-भांडी करण्याचे काम करते. साेसायटीच्या पार्किंगमध्ये ती एका खाेलीत राहण्यास आहे. तिची 24 वर्षीय मतिमंद मुलीगी हिचे मतिमंद पणाचा फायदा घेत आरोपीने तिला घरात बाेलवुन जबरदस्तीने तिचेसाेबत शारिरिक संबंध करुन तिला सहा महिन्यांची गर्भवती केले. तसेच तिच्या आईवडीलांना मारुन टाकेन अशी धमकी दिल्याने सदर गुन्हा पोलिसांनी आराेपीवर दाखल केला आहे. याबाबत मुंढवा पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...