आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकटात चोरी:पुण्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी वापरली अनोखी शक्कल, पीपीई किट घालून चार दुकानातून लाखो रुपयांची चोरी

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोरट्यांना पीपीई कीट कुठून भेटली याचा पोलिस तपास करत आहे

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. उद्योग-धंदे बंद असल्यामुळे लोक आपापल्या घरातच बसून आहेत. पण, यादरम्यान चोरटे शांत बसत नाहीयेत. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना होत आहेत. या काळात चोरट्यांनी आपल्या चोरीचा स्टाइल बदलली आहे. पुण्यात चोरीची एक अशी घटना घडली आहे. पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट(पीपीई) किट घालून चार दुकानातून लाखोंचा माल चोरला आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, घटना पिंपरीमधील रावेत परिसरात शुक्रवारी घडली आहे. पीपीई किट घालून चोरांनी तीन मेडिकल दुकान आणि एका किराना दुकानात चोरी केली. ही संपूर्ण घटना एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. पोलिसांनी घटनेची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. फुटेजमध्ये चोरटे, दुकानाचे शटर तोडून आत जात असल्याचे दिसत आहे. या चोरट्यांकडे पीपीई किट कुठून आली, याचा पोलिस सध्या तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...