आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका कारचालकाचा माेटारसायकलवरील चार चाेरटयांनी पाठलाग करुन कार चालकास जबरदस्तीने कार थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याचे कारने अपघात झाल्याचा बनाव करत कारचालकाच्या गळयातील साेन्याची चैन, माेबाईल असा माैल्यवान ऐवज पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे, अशी माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अमित दत्तात्र्य भाेसले (वय-31,रा.काेथरुड,पुणे) यांनी पोलिसांकडे माेटारसायकलवरील चार अनाेळखी इसमा विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदरची घटना 23 जानेवारी राेजी रात्री सव्वादहा वाजता डेक्कन काॅलेजजवळ आर्मी स्कुलच्या समाेर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमित भाेसले हे त्यांच्या कार मधून संबंधित ठिकाणावरुन जात हाेते. त्यावेळी दाेन माेटारसायकलवर चार इसम त्यांचे पाठीमागे पाठलाग करत आले. त्यांनी कारला दुचाकी आडवी घालत कारला थांबवुन तुझ्या कारमुळे पाठीमागे अपघात झाल्याचा बहाणा करुन, वाद सुरू केले. त्यानंतर कार चालकाची 20 ग्रॅम वजनाची साेन्याची चैन व एक माेबाईल असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चाेरी करुन नेला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस सातपुते करत आहे.
दुचाकीवरील तरुणाची लुटमारी
औंध परिसरातील गणेशखिंड राेडवरुन 23 जानेवारी राेजी रात्री सव्वादहा वाजता ऋषिकेश अरविंद जगदाळे (वय-21, रा.नवी सांगवी,पुणे) हा तरुण दुचाकीवर जात हाेता. त्यावेळी दाेन अनाेळखी इसम त्याचे पाठीमागून येऊन त्यांनी हेडफाेन लावूुन गाडी चालवताे का असे म्हणून त्यास अचानक हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यानंतर बळजबरीने त्याचे गळयातील 15 ग्रॅम वजनाची 65 हजार रुपये किंमतीची साेन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली आहे. याबाबत चतुश्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.