आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धू मुसेवाला प्रकरण:आरोपींबाबत पुणे ग्रामीण पोलिसांकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही - अभिनव देशमुख

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील प्रसिद्ध गायक मुसेवाला हत्या केस संदर्भात पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव, सौरभ महांकाळ या संशयीत आरोपींची नावे आहे. मात्र, याबाबत पंजाब पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली नाही, अशी माहिती सोमवारी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली .

आपली मदत नाही...

देशमुख म्हणाले, आपल्याकडे पंजाब पोलिसांची कुठलीही टीम आलेली नाही. जरी आली असेल तर त्यांनी आपली मदत घेतलेली नाही. संतोष जाधव हा आमच्यासाठी मंचर येथील ओंकार बाणखेले या खुनाच्या घटनेत वाॅन्टेड आहे. तो राजस्थान, पंजाब बार्डवर पळून गेला होता आणि अजूनही फरार आहे. एवढीच माहीती आमच्याकडे आहे. मुसेवाला मर्डरकेसमध्ये त्याचा काही रोल आहे का किंवा त्याचा काही रोल निष्पन्न झाला आहे का याच्याविषयी आमच्याकडे कोणतंही अधिकृत माहिती नाही.

अटकेचा दुजोरा नाही...

यासंदर्भातील माहीती पंजाब पोलिसच देऊ शकतील. पंजाब पोलिसांच्या तपास पथकाकडे चौकशी केली असता, त्यांनी आरोपीच्या अटके बाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही. जाधव यांच्यावर राजस्थान मधील गंगानगर येथे आर्मस ॲक्ट , खंडणी नुसार गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस राजस्थानमध्ये ही जाऊन आली आहे. सौरव महांकाळ या आरोपीबाबत अधिक माहिती घेण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...