आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे ग्रामीण जिल्ह्यातील गुटखा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासंदर्भात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार मागील तीन महिन्यात एक कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त करून करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी शनिवारी दिली आहे.
शिळीमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील उदय हॉटेलच्या पार्किंग मध्ये एक गुटख्याने भरलेला कंटेनर उभा आहे अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिस स्टेशन यांनी संयुक्तपणे सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करत, गुटख्याचा कंटेनर ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी इब्राहिम अब्दुल रशीद आणि नवाज लालन साहब कुरेशी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून अशोक लेलँड कंपनीचा ट्रक व 33 लाख 75 हजार रुपये किमतीचा सम्राट पान मसाला सुपारी गुटखा असा एकूण 40 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर गुटखा पोलिसांनी जप्त केला असून याबाबत आरोपींवर भिगवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीं विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवलदार स्वप्नील आहीवळे यांनी तक्रार दाखल केली आहे. सदरचा गुटखा हा कोठून आणला होता व कोणास विक्रीसाठी घेऊन चालले होते याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई अमित सिद पाटील, पो हवालदार स्वप्निल आहीवळे, अभिजीत एकशिंगे तसेच भिगवन पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, रुपेश कदम ,पोलिस नाईक मुळीक, एस मुलानी ,एन माने यांनी केलेली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.